Utthan Banner - Marathi

उत्थान

आपल्या आदिवासी बांधवांचे

Utthan

उत्थान

शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक मागासलेपणावर मात


आज, योग्य क्षमता व कौशल्ये आत्मसात केल्याशिवाय, लोक, वाढत्या ज्ञान-आधारित जागतिक समाजात स्पर्धा करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, आपल्या आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावर मात करणे आणि मुख्य प्रवाहातील भारतीय समाज आणि त्यांच्यामधील ‘कौशल्य आणि रोजगार’ संबंधांतील अंतर कमी करणे हे सर्वात कठीण आव्हान आहे.

केंद्रातील आदिवासी कामकाज मंत्रालय, आणि राज्य पातळीवरील संबंधित आदिवासी विकास / कल्याण विभागांना या आव्हानांवर मात करणे सुलभ व्हावे यासाठी, एंटेल्कीने आदिवासींच्या जीवनातील सर्व क्षेत्रांना स्पर्श करणाऱ्या बहु-आयामी व बहुउद्देशीय कार्यक्रम / प्रोजेक्ट “उत्थान”ची कल्पना, रचना, आणि निर्मिती केली ज्याची कांही महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत.

चला. आपल्या आदिवासी बांधवांच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणावर विजय मिळविण्यासाठी एकत्रितपणे कार्य करू या आणि मुख्य प्रवाहातील भारतीय समाज आणि आदिवासी बांधवांमधील दरी कमी करू या.

शिक्षणाचा दर्जा सुधारणे

एंटेल्कीच्या एनईपी २०२० ला अनुसरून असलेल्या विद्यार्थी समग्र विकास मॉडेल पेरिशिया©च्या सहाय्याने

स्थानिक नोकऱ्यांच्या संधीची निर्मिती

शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या केंद्रस्थानी स्थानिक पातळीवर भरती केलेले तरुण राहतील

कौशल्ये, क्षमतांमधील तफावत कमी करणे

उद्योग क्षेत्रांतील तज्ञांच्या मदतीने जीवन, व्यावसायिक आणि स्वयंरोजगार कौशल्यांचा विकास करणे

शिक्षकांच्या क्षमता व कौशल्यांचा विकास

शैक्षणिक निःष्पतींमध्ये सुधारणा करण्यासाठी शिक्षकांना तांत्रिक साधनांच्या वापराचे आणि पद्धतींचे प्रशिक्षण देणे

करिअर मार्गदर्शन

गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना कौशल्य आणि क्षमता विश्लेषणावर आधारित करिअर मार्गदर्शन

जागरूकता व जाणिवांची निर्मिती

आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा, कायदेशीर हक्क आणि विशेषाधिकारांसंबंधी युवकांमधील जाणीव व जागरूकता