हवा प्रदूषित का होते?

हवा प्रदूषित का होते?

 

वायू प्रदूषण म्हणजे रसायनांचे, जैविक सामुग्रीचे (Biological Materials) किंवा आरोग्यास घातक कणांचे (Unhygienic Particles) वातावरणात घुसणे, त्यामुळे नैसर्गिक हवा निकृष्ट दर्जाची होऊन जाते. त्याचा परिणाम, अस्वस्थता निर्माण होण्यात किंवा जिवंत प्राणीमात्रांना रोगाची बाधा होण्यात होतो.

कारखाने, वाहने आणि जळलेले पदार्थ यातून वातावरणात काही अवांछित वायू (unwanted gases) सोडले गेल्यामुळे हवा प्रदूषित होते. कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड हे वायू मुख्यतः सोडले जातात. तथापि, कार्बन डायऑक्साईड आणि कार्बन मोनॉक्साईड झाडांकडून शोषले जातात आणि फोटोसिन्थिसिसद्वारे (प्रकाशसंश्लेषण) ऑक्सीजन सोडला जातो. ही एक नैसर्गिक शुध्दीकरण प्रणाली आहे. पण, वृक्ष तोडीमुळे, या नैसर्गिक शुध्दीकरणाचा दर्जा खाली गेला आहे.  यामुळे अवांछित वायू, अधिक टक्केवारी मध्ये हवेत राहू लागले आहेत. सल्फर डायऑक्साइड व फ्लोरो-क्लोरो-कार्बन साहित्य देखील हवा प्रदूषित करीत आहे. अगदी जैविक गोष्टी कुजण्यामुळे सुद्धा (decaying biological matter) हवा प्रदूषित होते. या सर्वांमुळे देखील वातावरण, सहनशक्तीच्या मर्यादेपेक्षा, अधिक गरम होत आहे आणि स्ट्रॅटोस्फिअरमधील आणि मेसोस्फिअरमधील, ओझोन थर कमी होत चालला आहे. ओझोन थर कमी झाल्यामुळे, सूर्यापासून येणारे अतिनील किरण अधिक प्रमाणात वातावरणात प्रविष्ट होत आहेत आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत आहेत. हे घातक आहे. 

आम्ही अधिक झाडे लावली तर, आम्ही हवा प्रदूषण विरोधातली अर्धी लढाई जिंकल्यात जमा आहे. औद्योगिक प्रदूषके आणि वाहन उत्सर्जन यांच्या नियमावलीवरील नियंत्रण सुनिश्चित करून, उरलेल्या अर्ध्या लढाईत आम्ही विजयी होऊ शकतो. हे अशा प्रकारे महत्वाचे आहे की, आम्हाला, प्रदूषण नियंत्रणाची जाणीव असावी आणि आम्ही स्वयंप्रेरित असावे आणि त्यायोगे, निरोगी राहू तसेच वातावरणातील तापमान वाढ कमी करण्यास मदत करु.

 

मराठी