रबर काय आहे?

रबर काय आहे?

 

नैसर्गिक रबराचा उगम, रबराच्या झाडाच्या लाटेक्सपासून (कच्चे रबर) झाला. रबराची झाडं स्पर्ग (Euphorbiaceae) या प्रकारात मोडतात आणि उबदार, उष्णदेशीय भागात येतात. एकदा रबराच्या झाडाची, साल एखाद्या ठिकाणी काढली की, कच्चे रबर बाहेर वाहू लागते आणि गोळा केले जाते. जेव्हा ते हवेत उघडे ठेवले जाते तेव्हा ते घट्ट होण्यास सुरु होते आणि लवचिक, किंवा "रबरी" बनते. रबराची झाडं, फक्त विषुववृत्ताजवळील गरम, दमट हवामानात टिकून राहू शकतात आणि त्यामुळे, कच्च्या रबराचे, बहुतांश उत्पादन, मलेशिया, थायलंड आणि इंडोनेशिया या आग्नेय आशियाई देशांमध्ये होते. रबर जगात मोठ्ठ्या प्रमाणात वापरले जाते. ते रोजच्या आयुष्यात, उद्योगांत वापरले जाते आणि रबराचा, एक सर्वात सामान्य वापर, म्हणजे "रबर बँड" आहे, जे सामान्यपणे एकाधिक वस्तू, एकत्र ठेवण्यासाठी वापरले जाते. बहुतांश रबर बँडसची निर्मिती नैसर्गिक रबर वापरून  केली जाते, याचे प्रमुख कारण, त्याची वरच्या दर्जाची  लवचिकता.

रबर बँड शिवाय, रबर उत्पादनांचे, घरगुती तसेच औद्योगिक वापरात, अतिशय विस्तृत आणि विविध उपयोग आहेत. स्टेशनरीतील एक खोड रबर किंवा पावसाळ्यात वापरावे लागणारे शूज, अशा दररोज वापरल्या जाणाऱ्या उदाहरणांवरून आपण ते पाहू शकतो.

 

मराठी