आपण कपडे धुण्यासाठी डिटर्जंट का वापरतो?

आपण कपडे धुण्यासाठी डिटर्जंट का वापरतो?

डिटर्जंट पाण्यात मिसळून कपड्यावरील घाण आणि तेल काढून टाकते. पाणी कपड्यावरील तेल आणि घाण काढू शकत नाही. पाण्याबरोबर एक रासायनिक प्रक्रिया उद्भवल्या कारणाने, डिटर्जंट कपड्यावरील घाण आणि कचरा कपड्याबाहेर काढून टाकून कपडा साफ करते. डिटर्जंटस् कपड्याच्या कापडामध्ये अडकलेली घाण सोडविण्याचे आणि त्यांना छान स्वच्छ करण्याचे काम पाण्याच्या बरोबर करतात. डिटर्जंटस् निसर्गतः अल्कधर्मी आहेत. ते घाण किंवा तेल किंवा डाग यांच्या बरोबर रासायनिक प्रतिक्रिया करतात. एकदा रासायनिक प्रतिक्रिया झाली की, घाण / डाग आणि तेल कपड्यातील तंतूपासून सुटतात. त्यानंतर डिटर्जंटस्, डाग / घाण / तेल यांच्या भोवती एक थर तयार करतात आणि या कपड्यातील तंतूवर त्यांना पुन्हा अडकू देत नाही.

डिटर्जंटस्, कार्बन व हायड्रोजनच्या अणूंच्या एक लांब साखळीपासून, तसेच पाण्यात विरघळणाऱ्या एका आयोनिक गटाचे बनलेले असतात. सर्वाधिक डिटर्जंटस्, एक नकारात्मक चार्ज असलेल्या आयोनिक गटाचे असतात. या डिटर्जंटस् ना अॅनियॉनिक ( anionic ) म्हणतात आणि पृष्ठभागावर सक्रिय असलेले एजंट त्यात समाविष्टीत असतात. काही विशेष डिटर्जंटस् ना सकारात्मक आयोनिक (ionic) चार्ज असतो. या डिटर्जंटस् ना कॅटियॉनिक (cationic) म्हणतात आणि जंतुनाशक हा त्यांचा गुणधर्म आहे. कॅटियॉनिक डिटर्जंटस् सामान्यतः रुग्णालयात वापरले जातात.

पृष्ठभागावर सक्रिय असलेले एजंट, हायड्रोफोबिक (Hydrophobic) किंवा पाण्यात न विरघळणाऱ्या रेणूंच्या साखळ्यानी व हायड्रोफिलिक (Hydrophilic) किंवा पाण्यात विरघळणाऱ्या घटकांनी बनलेले असतात. हे पाण्यात न विरघळणारे रेणू पाण्यापासून मागे लोटले जातात, पण तेल आणि वंगण यांकडे आकर्षित होतात. पाण्यात विरघळणारे रेणू पाण्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे तेल आणि वंगण किंवा डाग यांकडे आकर्षित होणारे रेणू, या डागांच्या रेणूंना लपेटतात. त्यानंतर साबणाचे पाणी कपड्यातील तंतू साफ करतात.

नैसर्गिक साबणांचा कल सहज झिजण्याकडे असतो, तर डिटर्जंटस् झिजण्याचा प्रश्नच येत नाही.

डिटर्जंटस् देखील, जड पाण्याबरोबर, साबणा पेक्षा कमी तीव्र प्रतिक्रीया देतात. विरघळलेल्या खनिजांमुळे पाणी जड होते. त्यामुळे धुण्याचे पाणी जर जड असेल तर, ते साबणाच्या संपर्कात न विरघळणारे क्षार तयार करते. त्याचा परिणाम, कपडे, वॉशिंग मशीन आणि इतर कोणत्याही पृष्ठभागावर, एक बारीक पांढरा साका तयार होऊन त्यांच्यावर बसतो. हा थर काढण्यासाठी कठीण आणि खूप चिकट असतो. साबण अतिशय हलक्या पाण्यात चांगले काम करतो, पण कोणतेही क्षार असतील, तर समस्या निर्माण करतो. त्यामुळे, जरी पाणी जड असले, तरी आपले कपडे धुण्यासाठी डिटर्जंटस् सगळ्यात जास्त उपयुक्त असते.

म्हणून आपण कपडे धुण्यासाठी डिटर्जंटस् वापरतो..

 

मराठी