आपल्याला रेडिओ संचामध्ये कार्यक्रम कसे ऎकायला मिळतात ?

आपल्याला रेडिओ संचामध्ये कार्यक्रम कसे ऎकायला मिळतात?

 

ऊर्जा दोन मूलभूत स्वरुपात येतात : "पोटेन्शिअल " आणि "कायनेटिक"

पोटेन्शिअल ऊर्जा ही कोणत्याही प्रकारची संग्रहित ऊर्जा आहे; ती हालचालीतून दर्शविली जात नाही. पोटेन्शिअल ऊर्जा रासायनिक, आण्विक, गुरुत्वाकर्षणिक किंवा यांत्रिकं असू शकते.

कायनेटिक एनर्जी (ऊर्जा) ही हालचालीतून / गतीतून निर्माण होणारी ऊर्जा आहे :  इलेक्ट्रॉनसच्या हालचालींमुळे वीज मध्ये, एका ध्वनिलहरीकडून अणूंच्या कंपनांमुळे इ.

प्रत्येक स्वरूपातील ऊर्जा, इतर कोणत्याही स्वरूपाच्या ऊर्जेमध्ये बदलली जाऊ शकते. पण ऊर्जा नष्ट होत नाही किंवा ती तयारही करता येत नाही. ध्वनी ऊर्जा, यांत्रिक स्वरुपाची ऊर्जा आहे (म्हणजेच पोटेन्शिअल ऊर्जा) जी एका लहरीच्या स्वरूपात फिरते, जे  आकाराने मोठ्या अणूंच्या प्रसारित कंपनांच्या माध्यमातून साध्य होते. ही यांत्रिक लहर म्हणजे दाब कमी-जास्त होणे. द लॉज ऑफ थर्मोडायनामिक्सप्रमाणे, हा ध्वनीमुळे तयार झालेला दाब, त्याचे विद्युत ऊर्जेत परिवर्तन करण्यासाठी वापरला जाऊ शकतो.

विद्युत ऊर्जा, ही इलेक्ट्रॉनसच्या, अणूंमध्ये नकारात्मक चार्ज असलेले कण, हालचालींमुळे तयार झालेली कायनेटिक ऊर्जा आहे. ध्वनी लहरींचे रेडिओ लहरींमध्ये  रुपांतर केले जात नाही. प्रथम, मायक्रोफोन वापरून, ध्वनी लहरींचे, इलेक्ट्रिकल सिग्नल मध्ये रूपांतर केले जाते. मग हा सौम्य सिग्नल वाढविला(तीव्र केला) जातो. आता एक हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ लहर या तीव्र सिग्नलने समायोजित केली जाते. ही समायोजित रेडिओ लहर नंतर अवकाशातून प्रसारित केली जाते. रेडिओ संच, ह्या प्राप्त झालेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचे, विद्युत ऊर्जेत रुपांतर करतात आणि त्यापुढे ध्वनी लहरींत..

ध्वनी लहरींना, विविध फ्रिक्वेन्सी आणि वेव्ह लेन्थस (ध्वनीच्या उच्च-नीचतेशी संबंधित) आणि विविध मग्निटयूड्स ( किती उंच स्वरांचा याच्याशी संबंधित)   आहेत. या आधारे, पूर्वी अम्प्लिट्युड मोड्यूलेशन (AM) रेडिओ मध्ये वापरले होते. परंतु जेव्हा फ्रिक्वेन्सी मोड्यूलेशनचा (FM) शोध लागला, जी, विजेच्या  उपकरणांमुळे आणि वातावरणामुळे, येणारी निष्क्रियता आणि येणारे अडथळे, कमी करण्यास उपयुक्त होती, तेव्हा, आता हल्लीच्या दिवसात तिचा वापर होऊ लागला आहे. नंतर १९६० मध्ये एक खिशात मावेल एव्हढ्या छोट्या आकाराच्या ट्रान्झिस्टराईझ्ड रेडिओचा देखील शोध लागला होता.

आपले रेडिओज फक्त रिसिव्हर्स आहेत, हे समजून घेणे महत्वाचे आहे. विविध कार्यक्रम तयार करणाऱ्या रेडिओ स्टेशन्सकडे शक्तिशाली ट्रान्समिटर्स आहेत आणि त्यांच्याकडे सार्वजनिक बोलण्यासाठी रिसिव्हर्सदेखील आहेत. पण आपल्या मोबाइल फोनमध्ये रिसिव्हर्स आणि ट्रान्समिटर्स आहेत.

 

मराठी