विद्यार्थी

कौशल्ये व क्षमता वृद्धी

क्षमतांचा योग्य विकास हा पुढील

आयुष्याच्या सर्वतोपरी यशस्वी वाटचालीसाठी

अति उपयुक्त ठरतो

Skill Development

राष्ट्रीय युवा : सुयोग्य क्षमता व कौशल्य विकास

'प्रतिभा व्यवस्थापन' हे आजच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे [संदर्भ: हार्वर्ड बिझनेस रेव्हयू, https://hbr.org/]. भारतासारख्या प्रगतीशील देशात तर, अतिशय कमी असलेले 'मानव विकास' आणि 'शिक्षण निर्देशांक' [http://hdr.undp.org/en/statistics] हे, नीति रचनाकार, शिक्षणतज्ञ, व संपूर्ण समाजाकरिता, 'प्रतिभा व्यवस्थापनाचे' काम किती आव्हानात्मक आहे, ते दर्शवितात.

जीवनात, त्यांची कोणत्याही प्रकारची प्रगती साध्य करण्याचे अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून, देशाच्या, बाजार उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण यांसंदर्भातल्या धोरणांमुळे, त्यांचे 'पदवी प्रमाणपत्र' हे, फक्त एक किमान परंतु आवश्यकतेपेक्षा अतिशय अपुरी अशी अट बनल्याने, एकंदरीत परिस्थिती अतिशय आव्हानात्मक झाली आहे. उद्योगांच्या झपाट्याने वाढत चाललेल्या अपेक्षा आणि जागतिक स्पर्धा यांमुळे, शैक्षणिक संस्था, तसेच त्यांतून बाहेर पडणारे पदवीधर, यांच्या आव्हानांमध्ये तर कित्येक पटींनी वाढ झाली आहे.

वरील सर्व कारणांमुळे, 'पदवी धारकांची संख्या' वाढविण्याच्या सद्य प्रयत्नांच्या बरोबरीने, शिक्षण प्रणालीची गुणवत्ता आणि उपयुक्तता वाढवण्यासाठी, एकत्रित प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी, नित्यक्रमातील घोकंपट्टीवर आधारित शैक्षणिक पद्धतीऐवजी, आजच्या युवकांचे, "समर्थ, जागतिक पातळीवर सक्षम, तसेच जबाबदार नागरिकांमध्ये" रूपांतर करू शकणाऱ्या गुणात्मक बदलाची, शिक्षण पद्धतीमध्ये गरज आहे.

पेरिशिया © : एंटेल्की कौशल्य आणि क्षमता विकास मॉडेल

शैक्षणिक संस्थांना, ज्याप्रमाणे काही निवडक राज्य किंवा राष्ट्रीय परीक्षेत १००% यश अपेक्षित असते, किंवा इतर शैक्षणिक संस्थांच्या स्पर्धेत वेगाने पुढे जायचे असते, त्याचप्रमाणे वैयक्तिक पालकांना त्यांच्या पाल्याने केवळ शैक्षणिकच नव्हे तर अतिरिक्त शैक्षणिक परीक्षांत व स्पर्धांतसुद्धा नेत्रदीपक यश मिळवावे अशी अपेक्षा असते.

शैक्षणिक संस्था तसेच वैयक्तिक पालकांच्या या / अशा अपेक्षा पूर्ण करण्याचे काम सुलभ करण्यासाठी, एंटेल्कीने त्यांच्या 'पेरिशिया' या 'कौशल्ये आणि क्षमता विकास मॉडेलच्या' अंतर्गत, वर्षभर चालणाऱ्या 'समग्र बाल विकास' योजनेपासून ते दोन - तीन महिने कालावधीचे 'वैयक्तिक कौशल्य विकासाचे'विविध प्लॅन्स विकसित केले आहेत.

आपण, आपल्या गरजा आणि महत्त्वाकांक्षाच्या अनुसार, खालील, "कौशल्य आणि क्षमता विकास योजनांपैकी", सर्वात योग्य योजना निवडू शकता.

 

शैक्षणिक कामगिरी सुधारण्यासाठी

भाषा नैपुण्य

गणितीय क्षमता

विश्लेषण, तर्क आणि कारणमीमांसा

स्मरणशक्ती

मौखिक संभाषण

ग्रहण व आकलनशक्ती

एकाग्रता

सृजनशीलता

शारीरिक क्षमता : ताकत, स्टॅमिना व स्नायुंची लवचिकता

एकूण स्पर्धात्मकता सुधारण्यासाठी

भाषा नैपुण्य

गणितीय क्षमता

विश्लेषण, तर्क आणि कारणमीमांसा

स्मरणशक्ती

एकाग्रता

मौखिक संभाषण

ग्रहण व आकलनशक्ती

सृजनशीलता

सामान्य ज्ञान

वेळेचे व्यवस्थापन

शारीरिक क्षमता : ताकत, स्टॅमिना व स्नायुंची लवचिकता

व्यक्तिगत रोजगारक्षमता सुधारण्यासाठी

भाषा नैपुण्य

गणितीय क्षमता

विश्लेषण, तर्क आणि कारणमीमांसा

स्मरणशक्ती

ग्रहण व आकलनशक्ती

एकाग्रता

सृजनशीलता

मौखिक संभाषण

वेळेचे व्यवस्थापन

सामान्य ज्ञान

शारीरिक क्षमता : ताकत, स्टॅमिना व स्नायुंची लवचिकता

सुजाण व जबाबदार नागरिक घडण्यासाठी

वेळेचे व्यवस्थापन

सामाजिक भान

जबाबदारीची जाणीव

मूल्य प्रणाली व शिष्टाचार

पर्यावरण व्यवस्थापन

आपत्ती व्यवस्थापन

Thematic Diagram Entelki Model

मूलभूत / पायाभूत कौशल्ये

दररोजच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, पुरेसे पैसे मिळू शकणारी कामे मिळण्याकरिता, आवश्यक अशा मूलभूत / पायाभूत कौशल्यांमध्ये, प्राथमिक पातळीवर, साक्षरता आणि सांखीय कौशल्ये यांचा समावेश आहे.

हस्तांतरणीय कौशल्ये

समस्या सोडविण्याची क्षमता, प्रभावी संवाद आणि सर्जनशीलता इ. कौशल्ये, विविध कामांमधील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आणि लाभदायक रोजगारा मध्ये राहण्याच्या शक्यता सुधारण्यासाठी आवश्यक असतात.

व्यावसायिक कौशल्ये

मूलभूत आणि हस्तांतरणीय कौशल्यांच्या माध्यमातून, एक भक्कम पाया विकसित केल्यानंतर, प्राथमिक पायरीपासून उच्च कुशल पायरीपर्यंत, नोकरीतील विशिष्ट तांत्रिक माहिती मिळविण्याचा या कौशल्यामध्ये समावेश आहे.

उद्योजकता कौशल्य

उद्योजकता विकासासाठी मूलतः, मूलभूत आणि इतर हस्तांतरणीय कौशल्यांचा एक भक्कम पाया असणे आवश्यक आहे, ज्यामुळे यशाच्या पाठोपाठच्या चांगल्या संधी सुनिश्चित करता येतात.