Institute Page

संस्थात्मक धोरणे व उद्दीष्टे साध्य करणे

'योग्य नोकरीसाठी योग्य माणूस' हा आजच्या जगाचा नियम आहे. जेंव्हा एखादी संस्था, प्रत्येक विद्यार्थ्यास, त्यामधील अंगभूत वैशिष्ट्ये, क्षमता आणि कौशल्यांवर आधारित मार्गदर्शन करण्यास आणि त्याचा प्रभावीपणे विकास करण्यास सक्षम असते, तेव्हा त्या संस्थेचे विद्यार्थी, त्यांच्या वैयक्तिक जीवनात यशस्वी होतीलच, तसेच संस्थेस मोठा सन्मान मिळवून देऊन संपूर्ण राष्ट्रालाही गौरव प्राप्त करून देतील, याबाबत तिळमात्र शंका नाही.

सामान्यपणे चालत आलेल्या 'फक्त अभ्यासक्रमावर आधारित विकास’ अशा मर्यादित दृष्टिकोनापेक्षा, प्रत्येक विद्यार्थ्याची जन्मजात कौशल्ये आणि क्षमता, त्याच्या जडण घडणीच्या वयादरम्यान ओळखून त्यांचा विकास करणे, हे कितीतरी अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. हा दृष्टीकोन शैक्षणिक संस्थांना फक्त महत्वाच्या परीक्षा व स्पर्धा यांमध्ये शैक्षणिक यश मिळविण्यातच मदत करेल असे नाही, तर विद्यार्थ्यांचा 'सर्वांगीण विकास’ साध्य करून मूल्य प्रणाली जोपासतील असे जबाबदार नागरिक निर्माण करण्यासाठीही तो सहाय्यभूत होईल.

शैक्षणिक यश

आज इयत्ता १० वीच्या परीक्षा, ज्या शाळांच्या कामगिरीचे दर्शक मानल्या जातात, उच्च शिक्षण प्रणालीतील प्रवेशासाठी, 'आर या पार' अशा स्वरूपाच्या 'आवश्यक / पूर्वअट चाचण्या' म्हणून पाहिल्या जातात. म्हणूनच, विद्यार्थ्यांचा या परीक्षांमधली उच्च कामगिरीचा संबंध, या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची कसून तयारी करून घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांच्या 'शैक्षणिक यशस्वीतेशी' जोडला जातो.

संस्थेचा सर्वांगीण विकास

प्रत्येक शैक्षणिक संस्था, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची निष्पत्ती, ही, अभ्यासू आणि सह-अभ्यासू अशा दोन्ही कार्यक्षेत्रांसंबंधी, एका सर्वसमावेशक मूल्यांकन पद्धतीच्या स्वरूपात उपलब्ध असण्याची अपेक्षा बाळगते. अशा प्रकारे अपेक्षित असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये, त्यांच्या कांही विशिष्ट कौशल्ये व क्षमतांचा अंतर्भाव असणे अपेक्षित आहे, जसे की, अधिक सर्जनशील आणि नाविन्यपूर्ण असणे, अत्यंत सखोल व तार्किक विचार करू शकणे, प्रभावीपणे संवाद साधणे, विश्लेषण आणि स्वतंत्रपणे विचार करून समस्या सोडविणे इत्यादी.

जबाबदार नागरिक घडविणे

"केवळ बुद्धिमत्ता पुरेशी नाही. बुद्धिमत्ता व चारित्र्य, हे खरे शिक्षणाचे ध्येय आहे"
            — मार्टिन ल्युथर किंग (ज्युनिअर).
उद्याचे जबाबदार नागरिक घडविणे ही प्रत्येक शैक्षणिक संस्थेची एक अव्यक्त जबाबदारी आहे. आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी, केवळ स्वतःविषयीच नव्हे, तर इतर लोकांचे बाबतीतही अत्यंत आदर बाळगावा, व त्यांच्याशी जबाबदारीने वागावे असे त्यांना वाटते. तसेच त्यांनी (विद्यार्थ्यांनी), फक्त स्वतःचेच हित न पाहता इतरांच्या गरज आणि भावना यांचाही विचार करावा असे वाटते.

एंटेल्कीचे 'पेरिशिया' मॉडेल

प्रत्येक शैक्षणिक संस्थेला वर नमूद केलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, एंटेल्कीने 'पेरिशिया' हे एक बहुभाषिक, आयसीटी आधारित, 'विद्यार्थी कौशल्य आणि पूरक विकास प्रारूप / मॉडेल' विकसित केले आहे. हे मॉडेल, 'प्लॅन - डू - चेक - ऍक्ट' या अत्यंत प्रभावी पद्धतीचा वापर करून, प्राथमिक, माध्यमिक, तसेच उच्च माध्यमिक शालेय विद्यार्थ्यांमध्ये विविध महत्त्वाची कौशल्ये आणि वैशिष्ट्ये, विकसित करते, 'तर्कशास्त्र आणि युक्तिवाद', 'भाषा प्राविण्य', 'गणितीय नैपुण्य', 'एकाग्रता', 'सर्जनशीलता', 'स्मरणशक्ती', 'सामाजिक संवेदना', 'टाईम मॅनेजमेंट' इत्यादी.
कौशल्य आणि वैशिष्ट्ये यांचा विकास हा उपक्रमांच्या माध्यमातून होत असल्याने, विद्यार्थी ते (उपक्रम) अतिशय आनंदाने करतात, आणि त्यातूनंच त्यांच्यामध्ये कौशल्य आणि वैशिष्ट्ये विकसित होतात. सातत्यपूर्ण व सर्वंकष मूल्यांकन पद्धती, प्रत्येक विद्यार्थी, संपूर्ण वर्ग, तसेच संपूर्ण शाळा यांच्या कामगिरीमधील सुधारणा दृश्य, दिवसाच्या कोणत्याही वेळेला दर्शविते.

एंटेल्कीचे ‘जीवन दिशा’ मॉडेल

मोठ्या संख्येने आज उपलब्ध असलेले करिअर पर्याय आणि त्यासोबत असलेले प्रगत तंत्रज्ञान यांमुळे वास्तविक आजच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरविषयी माहितीपूर्ण निर्णय घेणे, आणि अधिक आत्मविश्वासाने करिअरचा मार्ग निवडणे शक्य झाले पाहिजे. परंतु, आजचे सातत्याने विकसित होत असणारे रोजगार क्षेत्र, हे, करिअरची निरनिराळी क्षेत्रे ही अत्यंत अनाकलनीय, तर आजची अनेक प्रचलित करिअरची क्षेत्रे अत्यंत वेगाने अप्रचलित बनवित आहे. एंटेल्कीच्या मानव संसाधन व बाल मानसशास्त्र तज्ञांनी, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेला, 'जीवन दिशा' विद्यार्थी 'कौशल्य प्रोफाइलिंग' प्लॅन, हा, विद्यार्थ्यांसमोर असलेल्या 'करिअर निवडीच्या' यक्ष प्रश्नावरील एक अत्यंत खात्रीलायक उपाय आहे..
वैयक्तिक व्यक्तिमत्त्वाच्या ३४ हून अधिक कौशल्ये आणि वैशिष्ट्यांचे, एका अत्यंत तपशीलवार SWOT विश्लेषणाच्या माध्यमातून, विद्यार्थ्यांना, त्यांच्या चालू ताकद व कमकुवतपणाविषयी पूर्ण माहिती होते, दहा सर्वोत्तम उपयुक्त करिअरचे मार्ग सूचित केले जातात, आणि कमकुवतपणाचे ताकदिमध्ये मध्ये रूपांतर करण्यासाठी एक तपशीलवार कृती योजना उपलब्ध करून दिली जाते.

एंटेल्की प्रोफाइलिंग आणि व्यवसाय मार्गदर्शन परीक्षा

प्रशंसापत्रे

वर्गातील स्वारस्य, आनंद वाढला.

या उपक्रमातून विद्यार्थ्याना काही करण्याची प्रेरणा मिळाली.एकाग्रता, नेतृत्व विकास, शब्द संपत्ती वाढली.

इंग्रजी लेखन, वाचन सुधारले. बाह्य वाचन, सामान्य द्यान मिळविण्याची आवड निर्माण झाली. वर्गातील स्वारस्य, आनंद वाढला.

- सौ. शुभदा साठे. मुख्याध्यापिका, शाळा क्र. ८, भागेश्वर विद्यामंदिर. रत्नागिरी.

हा एक उत्तम कार्यक्रम आहे आणि आमच्या सर्व शाळांमध्ये तो राबविला गेला पाहिजे.

विद्यार्थ्यांच्या स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता, आकलन, कारणमीमांसा व जिज्ञासूपणा यांच्यात सुधारणा झाली आहे. त्यांचे आत्मविश्वास सुधारले आहेत. एकलकोंडे विद्यार्थी आता वर्गाच्या उपक्रमात सहभागी होऊ लागले आहेत.

ज्ञानात वाढ झाल्याचा आणि त्यांच्या अध्यापनाच्या तंत्रात सकारात्मकता आल्याचा अनुभव त्यांना आला. विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या उत्साहात सुधारणा झाली आहे.

- सौ रंजना तासकर, उपाध्यक्ष उषाताई लोखंडे ट्रस्ट