वारंवार विचारलेले प्रश्न


FAQ Page

  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न - शैक्षणिक संस्था

आदर्शरीत्या, एक चांगली/ अद्ययावत संगणक प्रयोगशाळा असेल तर परिणाम जास्त चांगले मिळतील. परंतु, हे मॉडेल राबविण्य्साठी एक संगणक आणि इंटरनेट पुरेसा आहे. प्रिंटर उपलब्ध असल्यास अधिक उपयोग होऊ शकेल.

शिक्षक हे मार्गदर्शकाचे काम करतात आणि हे उपक्रम वर्गात करून घेतले जातात. यामुळे हे शक्य (आणि योग्य) नाही की फक्त मोजकेच विद्यार्थी याचा उपयोग करतील.

नाही. हे उपक्रम शाळेतील 'कार्यानुभव' सत्राखाली किंवा वेगळ्या सत्राद्वारे आयोजित केले जातील.

या उपक्रमांची एकूण जबाबदारी वर्गशिक्षकांकडे असेल परंतु शरीरिक प्रशिक्षण, माहिती तंत्रज्ञान(IT), कार्यानुभव इत्यादी विषयांशी संबंधित उपक्रमांसाठी त्या विषयांचे शिक्षकसुद्धा सहभागी होतील. वर्गशिक्षक हे उपक्रमांचे समन्वयक असतील तसेच सर्व इयत्तांसाठी पर्यवेक्षक व मुख्याध्यापक हे समन्वयक असतील.

आदर्शरीत्या, पालक व शिक्षकांनी हे मॉडेल एकमेकांचा सहकार्याने मुलांचा विकासासाठी राबविले पाहिजे. विकासाचा उपक्रमामध्ये असे नमूद केले आहे की पालकांचा सहभाग काही विशिष्ट उपक्रमांमध्ये महत्वाचा आहे (उदा., वेळेचे महत्व विकसित करणे, स्वसंघटन इत्यादी). पालक व मार्गदर्शकांनी महिन्यातून एकदा सर्व घडामोडींविषयी चर्चा करणे अपेक्षित आहे.

या मॉडेलसाठी शाळांनी ई-मेल अथवा 'संपर्क साधा' या विभागामध्ये दिलेल्या दूरध्वनीवर संपर्क करावा. आम्ही या संदर्भात पुढील मार्गदर्शन देऊ.

शिक्षकांना माहिती तंत्रज्ञान (IT) या विषयाचे सखोल ज्ञान असणे गरजेचे नाही. त्यांना या विषयातील मुलभूत ज्ञान उदा., ई-मेल पाठविणे, इंटरनेट वापरणे, माहिती डाऊनलोड करणे इ. असणे पुरेसे आहे. उपक्रम राबविण्यापूर्वी एन्टेल्कीतर्फे, शिक्षक, पर्यवेक्षक व मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्यात येईल. दिलेले प्रशिक्षण व मॉडेल वापरताना मिळालेला अनुभव हे उपक्रम राबविण्यासाठी पुरेसे आहेत. या व्यतिरिक्त मॉडेल वापरण्याकरिता मार्गदर्शिका एन्टेल्कीकडून प्रत्येक शाळेला देण्यात येईल. इतर काही समस्या आल्यास एन्टेल्कीतर्फे ऑनलाईन आणि ऑफलाईन मदत देण्यात येईल.

हे उपक्रम 'कार्यानुभव' व इतर विषयांच्या सत्राखाली आयोजित केल्यामुळे याकरिता शिक्षकांवर अधिक कार्यभार पडणार नाही. वास्तविक या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सर्वांगीण कार्यक्षमता वाढेल. ही वेबसाईट वापरण्यास सोपी असल्यामुळे, कालांतरानी शिक्षकांना वापरणे सोयीचे होइल.

हे मॉडेल 'वेबसाईट' चा स्वरुपात असल्यामुळे त्याकरिता CD ची आवश्यकता नाही. या वेबसाईटद्वारे 'डायनामिक' (गतिमान) माहिती घेऊन त्याप्रमाणे आपल्याला निकाल दिसतात. CD ही फक्त अशा व्यावसायिकांद्वारे दिली जाते जिथे माहिती ही न बदलणारी असते (उदा: न्युटनचे शास्त्र किवा गणितातील प्रमेय इत्यादी). एन्टेल्की मॉडेलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचा विकास वेगळा असल्यामुळे गतिमान आहे. यामध्ये शिक्षकांना स्वतःचे काही उपक्रमसुद्धा आयोजित करणे शक्य आहे. हे सर्व लक्षात घेता, या मॉडेलची CD उपलब्ध करणे योग्य होणार नाही.

हो, वैयक्तिक विद्यार्थ्यांनादेखील उपलब्ध आहे. आमची 'व्यवसाय मार्गदर्शन चाचणी' वैयक्तिक विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे.

  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न - व्यवसाय मार्गदर्शन चाचणी

व्यवसाय मार्गदर्शन चाचणी म्हणजे विविध मूलभूत मानवी कौशल्ये व क्षमता यांच्यावर आधारित एखाद्या व्यक्तीची कामगिरी तपासण्यासाठीच्या प्रश्नांचा एक संच. ही चाचणी 'बौद्धिक', 'भावनिक', 'जीवन कौशल्ये' आणि 'इतर गुणवैशिष्ट्ये' या गुणवैशिष्ट्यांच्या दृष्टीने त्या व्यक्तीची बलस्थाने व कमकुवतस्थाने आणि कल सूचित करते. या गुणवैशिष्ट्यांच्या आवश्यक मिश्रणातून कोणतीही व्यक्ती त्याच्या जीवनातील ठराविक कारकिर्दीत यशस्वी होते. अशा प्रकारे, व्यवसाय मार्गदर्शन चाचणी म्हणजे मानवी व्यक्तिमत्व समजून घेण्याची एक पद्धत आहे.

नाही. चाचणी ज्ञान आणि शिक्षणापेक्षा वेगळया प्रकारची आहे.

प्रत्येक करिअरमध्ये काही कौशल्ये आवश्यक असतात. एक उदाहरण द्यायचे झाल्यास, शास्त्रज्ञ होण्यासाठी उत्कृष्ट विश्लेषणात्मक क्षमतेची आणि प्रचंड संयमाचीसुद्धा आवश्यकता असते. त्याने / तिने नवीन गोष्टींचा शोध लावण्यासाठी सर्जनशील विचार करणे किंवा कल्पकतेने काही समस्यांचे निराकरण करणे देखील आवश्यक असते. विश्लेषणात्मक क्षमता, संयम आणि सर्जनशीलता शास्त्रज्ञ होण्यासाठी अनिवार्य आहेत. तसेच, एक वकील होण्यासाठी, तर्कशास्त्र, संवाद कौशल्य तसेच समय सूचकता अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक करिअरमध्ये काही कौशल्यांची आणि क्षमतांची आवश्यकता असते. ही चाचणी देणाऱ्या उमेदवाराला उपलब्ध करिअर्समधील सगळ्यात योग्य करिअर ठरवण्यासाठी चाचणीतील त्याच्या कामगिरीच्या निकालात दिसलेल्या त्याच्या कौशल्यांच्या आणि क्षमतांच्या पातळीची मदत होते.

प्रत्येक व्यक्तीच्या त्याच्या / तिच्या मनात एक 'त्याच्या / तिच्या स्वप्नातील करिअर' असते. तथापि, प्रश्न हा आहे की, ती व्यक्ती त्या कारकिर्दीत यशस्वी होईल का? उत्तर आहे, 'त्या कारकिर्दीत यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या कौशल्ये आणि क्षमतांचे आवश्यक मिश्रण त्या व्यक्तीमध्ये असेल तर ती व्यक्ती यशस्वी होऊ शकते'. जर आवश्यक असलेली कौशल्ये आणि क्षमता त्या व्यक्तीमध्ये नसतील तर, तफावत विश्लेषण आवश्यक असलेली विविध कौशल्ये आणि क्षमता यांमधील उमेदवाराचा स्कोअर आणि कोणत्याही करिअर्ससाठी विविध कौशल्ये आणि क्षमता यांचा आवश्यक स्कोअर यांच्या मधील तफावती दर्शवेल. आवश्यकतेपेक्षा कमी पडणाऱ्या अशा कौशल्ये आणि क्षमता यांच्यातील सुधारणा घडवून आणण्यामुळे उमेदवाराला त्याच्या / तिच्या स्वप्नातील करिअरमध्ये यशस्वी होता येईल. समुपदेशनातून (वैयक्तिक आणि ऑन लाईन), आम्ही सुधारणा घडवून आणण्याच्या कार्यपद्धती सुचवितो.

पहिले, ही व्यवसाय मार्गदर्शन चाचणी तफावत विश्लेषण करून दाखवते. दुसरे म्हणजे, विशेष करून भारतीय वातावरणाचा विचार करून ती तयार केली आहे. तिसरे असे की, ९ वी इयत्तेपासून १२ वी इयत्तेतील विद्यार्थ्यांसाठीच्या, व्यवसाय मार्गदर्शन चाचणीची पातळी पदवीपूर्व विद्यार्थ्यांसाठीच्या व्यवसाय मार्गदर्शन चाचणीपेक्षा वेगळी आहे. सगळ्यात शेवटी, चाचणी १०० पेक्षा जास्त करिअर्स आणि त्यांच्या संबंधीची माहिती सूचित करते.

आदर्शरीत्या, वयाच्या १५ व्या वर्षानंतर, पदवीधर होईपर्यंत चाचणी उपयुक्त आहे.

चाचणी 'ऑन-लाइन' आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक माहिती भरल्यानंतर योग्य शुल्क देऊन चाचणीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी केल्यानंतर, प्रत्येक विद्यार्थ्याला / उमेदवाराला युजर आय-डी आणि पासवर्ड दिले जातात. युजर आय-डी आणि पासवर्ड वापरून उमेदवार वेबसाइट उघडू शकतो आणि प्रणाली मध्ये 'लॉग इन' करून चाचणी देऊ शकतो. प्रणाली साइटवर तपशीलवार सूचना दाखवते. चाचणी देणाऱ्या उमेदवाराने सूचना वाचल्याच पाहिजेत आणि नंतर चाचणी द्यावी. सगळ्यात शेवटी, जेंव्हा शेवटच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाते तेव्हा, उमेदवार प्रणालीला चाचणी 'सादर' करतो. प्रणाली चाचणी तपासते आणि 'माझी कामगिरी' या बटणावर क्लिक केल्यानंतर चाचणीचा निकाल दाखवते. अधिक स्पष्टीकरणासाठी, एंटेल्कीशी 09823980987 या नंबरवर संपर्क साधा.

  • वारंवार विचारले जाणारे प्रश्न - पालक ( इंडिव्हीज्युअल मॉडेल )

मुले भावनिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या विकसित होतील. जीवन कौशल्ये संपादन करता येतील, ज्यामुळे मुलाच्या क्षमता धारदार होण्यास मदत होईल. या सगळ्याचा आणखी एक फायदा असा की शैक्षणिक गुणवत्तेत सुधारणा होईल. मुलाच्या सामान्य जाणीवा देखील मोठ्या प्रमाणात सुधारतील. मुलाच्या शारीरिक दर्जात देखील सुधारणा होईल.

पालक मार्गदर्शक म्हणून काम करतील आणि एंटेल्की वेब-साईटवर दिलेल्या निर्देशानुसार मुलाला उपक्रम करायला लावतील. पालकांनी, उपक्रम करण्यापूर्वी मुलाला मार्गदर्शन करणे आणि प्रत्येक उपक्रम झाल्यानंतर उपक्रमाच्या शेवटी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मुलाचे मूल्यमापन करणे, अपेक्षित आहे. पालक वेबसाइटवर मूल्यमापनाची नोंद करतील आणि कामगिरीवर मुलाला थोडक्यात सूचना देतील, जेणेकरून मूल पुढील सुधारणा करू शकेल. ही वर्षभर चालू राहणारी प्रक्रिया आहे.

साधारणपणे, प्रत्येक उपक्रम ३० ते ४० मिनिटांच्या कालावधीत पूर्ण होऊ शकतो. केवळ काही उपक्रम दोन सत्रांपर्यंत सुरू ठेवावे लागतात. पालकांनी दर आठवड्याला किमान दोन उपक्रम राबवणे अपेक्षित आहे. तथापि, अधिकतम उपक्रम राबविण्याचे बंधन नाही. त्यामुळे, पालकांनी मुलाबरोबर दर आठवड्याला किमान १ ते १.५ तास गुणवत्ता वेळ खर्च करणे आवश्यक आहे. दर आठवड्याला अधिक वेळ देण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकांना चांगले परिणाम बघण्यास मिळू शकतात.

एक संगणक / लॅपटॉप, इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध असणे पुरेसे आहे. प्रिंटर उपलब्ध असेल तर, अधिक चांगले. तथापि, ते पर्यायी आहे.

प्रणाली अतिशय सोयीची आहे आणि सॉफ्टवेअर प्राविण्याची आवश्यकता नाही. जो कोणी, इंटरनेटचा वापर करतो आणि नियमित मेल पाठवितो आणि घेतो आणि फेस बुक किंवा तत्सम सोशल मीडिया सुद्धा नियमित वापरतो, तो हे मॉडेल सहज वापरू शकतो.

प्रणालीत, वापरकर्ता निवडेल तेव्हा एक अहवाल कार्ड निर्माण करण्याची एक पद्धत आहे. अहवाल कार्ड निर्मितीत विविध स्वभाव वैशिष्ट्यांमधील मुलांची स्थिती तपासण्याचा एक पर्याय आहे. तक्त्याच्या व ग्राफिकल दृश्याच्या स्वरुपात तो पालकांना उपलब्ध आहे. याचा फायदा असा आहे की मुलाची कमकुवत स्थाने ओळखली जातात आणि पालक मुलाच्या कमकुवत स्थानांच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतात. प्रत्येक प्रकारचा उपक्रम आणखी जास्त वेळा करण्यासाठी ५ वेळा त्याची पुनरावृत्ती करता येऊ शकते. समाविष्ट बाबी प्रत्येक वेळी बदलण्याचे पालकांना स्वातंत्र्य आहे.

आमच्या संपर्क पत्त्यावर किंवा मेलने किंवा टेलिफोनने आम्हाला संपर्क करण्यासाठी आपले सहर्ष स्वागत आहे आणि आमचे तांत्रिक मदतनीस ताबडतोब आपली मदत करतील.

जेंव्हा आपण आमच्याकडे नोंदणी करता (नोंदणी बटणावर जा आणि तेथे क्लिक करा), तेव्हा आपल्याला एक वापरकर्ता अधिकृत ओळख कोड (a user identification code) आणि पासवर्ड (आपण स्वत:सुद्धा निर्माण करू शकता) देण्यात येईल. आपल्याला, आपल्या मेल वर एक लिंक मिळेल आणि ती लिंक उघडल्यावर आपण आपला पासवर्ड रीसेट करू शकता. पासवर्डची नोंदणी एकदा झाल्यानंतर, आपण साइट वापरण्यासाठी मुक्त आहात. साइट वापरण्यासाठी, साइट लॉग इन करा (एक मानवी चिन्ह असलेले बटण क्लिक करून). साइट "माझी योजना" या पृष्ठावर घेऊन जाईल. आपण क्षमता विकास टॅबच्या माध्यमातूनही जाऊ शकता आणि बौद्धिक - भावनिक, जीवन कौशल्ये, शारीरिक कवायती आणि प्रकल्प यां अंतर्गत असलेले उपक्रम करू शकता . या प्रत्येका अंतर्गत असलेल्या उपक्रमांच्या संचांची शीर्षके तुम्हाला दाखवली आहेत. आपण कोणतेही उपक्रम उघडण्यासाठी आणि करण्यासाठी मुक्त आहात. जेंव्हा, आपण कोणताही उपक्रम पूर्ण कराल आणि त्याचे मूल्यमापन भरून, तो सेव्ह कराल, तेंव्हा पूर्ण केलेला उपक्रम यादीतून बाहेर जाईल आणि पुढील उपक्रम दिसू लागेल. 'बौद्धिक - भावनिक' आणि 'जीवन कौशल्ये' उपक्रम संतुलितपणे आणि आळीपाळीने करण्याकडे आपले लक्ष्य असणे आवश्यक आहे. शारीरिक कवायतींचे उपक्रम नियमितपणे करत रहा. मॉडेलमध्ये एक "ज्ञान समृद्धी" टॅब देखील आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही सामान्यज्ञान विभागात जाऊ शकता. मुलाला प्रकल्पसुद्धा करायला लावा.

होय, पूर्व नियोजित वेळ घेऊन ते उपलब्ध आहे.

क्षमता विकास टॅब अंतर्गत एक बटण आहे, ज्यावर प्रवेश परीक्षा असे लिहिले आहे. हे 'माझा प्लॅन' या पानातून देखील उपलब्ध आहे. हा एक प्रश्न संच आहे, जो आपण डाउनलोड करू शकता (डाउनलोड बटण दिलेले आहे) आणि आपल्या मुलाला त्या साध्या बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरे देण्यास सांगा. जेंव्हा आपण, आपल्या मुलाचे प्रतिसाद प्रणालीला सादर करून, प्रणाली मध्ये जतन करता तेव्हा, प्रणाली आपल्या मुलाची त्याच्यासाठी महत्वपूर्ण असलेली विविध कौशल्ये आणि स्वभाव वैशिष्ट्ये यांमधील त्याची कामगिरी दाखवते. ती आधाररेखा सूचित करते. त्यानंतर, ज्या उपक्रमांची योजना कौशल्ये आणि स्वभाव वैशिष्ट्ये यांच्याशी संबंधित केलेली आहे, त्यांमधील विविध उपक्रम करून मुलाने आधाररेखेतून सूचित झालेली कामगिरी उंचावणे अपेक्षित आहे. हे 'अहवाल कार्डच्या' माध्यमातून पाहिले जाऊ शकते.