About Us

कंपनीची रूपरेखा

'Entelki' ( एंटेल्की ) हा शब्द 'entelechy' या ग्रीक शब्दापासून तयार केलेला आहे. 'entelechy' चा अर्थ आहे 'क्षमतांची पूर्तता'. आमचा असा विश्वास आहे की, प्रत्येक व्यक्तीमध्ये जन्मजात क्षमता निश्चित असतात. कोणालाही यश साध्य करण्यासाठी, प्रथमतः त्याला किंवा तिला, स्वतःच्या क्षमता शोधणे आवश्यक आहे, ज्यामध्ये स्वत: ची ओळख, प्रबळ गुणवैशिष्ट्ये आणि जन्मजात कौशल्यांच्या विविध पातळ्या समजून घेणे अंतर्भूत आहे. तथापि, आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, हे फक्त जाणून घेणे, पुरेसे नाही. विविध गुणवैशिष्ट्ये आणि कौशल्ये यांच्या स्वरूपातील जन्मजात क्षमतांचा विकास किंवा त्यांच्यात सुधारणा, विशेषतः मुलांच्या पायाभूत वर्षात, त्यांची परिपूर्ती होईपर्यंत करणे अतिशय महत्त्वाचे आहे.

टीम एंटेल्की

टीम एंटेल्कीत, मानव विकास, शिक्षण, बाल मानसशास्त्र आणि शैक्षणिक विषय, अशा विविध क्षेत्रातील २० ते ३० वर्षांचा अनुभव असलेल्या तज्ञांचा एक गट आहे. हे तज्ञ, चांगल्या परिणामांनी आणि प्रभावांनी प्रणाली समृद्ध करण्यासाठी मौल्यवान तांत्रिक आधार प्रदान करीत असतात.

सल्लागार मंडळ

विस्तृत कार्यक्षेत्रातील उद्योग तज्ञ, उद्योगांच्या आवश्यकतांच्या तुलनेत, आमच्या वेबसाईट द्वारे प्रदान केल्या जात असलेल्या सेवांवर सतत देखरेख ठेवतात आणि सामाजिक गरज व प्रणालीची क्षमता यांच्या दरम्यान योग्य संतुलन राखण्याच्या दिशेने आम्हाला नित्यनेमाने सल्ला देत असतात.

आमचे भागीदार

विविध संस्था शिक्षणाची गुणवत्ता वाढवायला आणि शिक्षण प्रणाली आणखी सक्षम करण्यासाठी काम करतात. शालेय मुलांमध्ये मूलभूत क्षमता वाढवण्यासाठी एंटेल्की या संस्थांबरोबर काम करते.

आमची उपस्थिती

बहुभाषिक प्रणाली असल्याने, एंटेल्कीचे ग्राहक संपूर्ण भारतभर पसरलेले आहेत. एंटेल्कीचे ग्राहक शहरी, ग्रामीण तसेच आदिवासी भागांमध्ये देखील आहेत.