Skills and Competency Development: Creating a Vibrant Human

कौशल्य आणि क्षमता विकास : एका प्रभावी व्यक्तीची निर्मिती

 

संपूर्ण जग कौशल्य विकासाबद्दल बोलत आहे. भारतातील परिस्थितीही वेगळी नाही. नरेंद्र मोदी, भारताचे आदरणीय पंतप्रधान, कौशल्य विकासावर आधारित जागतिक पातळीवरील नोकऱ्यांच्या संधींविषयी बोलत आहेत. हा मुद्दा पुढे घेऊन जाण्यात अनेक सरकारे सहभागी आहेत. पण, बहुतांश लोक बेरोजगारी समस्येचा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने एक नोकरी मिळण्याच्या सुलभतेसाठी व्यावहारिक कौशल्यांबाबत बोलत आहेत. जोपर्यंत मूलभूत गुण व कौशल्ये एखाद्या मुलात बिंबवली जात नाहीत तोपर्यंत अगदी व्यावहारिक 'नोकरी देणाऱ्या कौशल्यांमुळे' कोणतीही व्यक्ती यशस्वी होण्याची शक्यता नाही.

याच्याकडे विस्तृत दृष्टीकोनाने आणि दूरदृष्टीने पाहणे आवश्यक आहे. मानवी विकास आणि पोषणाचे पाच मुख्य स्तंभ आहेत. ते आहेत - बौद्धिक क्षमता, भावनिक शक्ती, जीवन कौशल्ये, शारीरिक क्षमता आणि ज्ञान त्याच्या उपयोजनेसह. पौगंडावस्थेत म्हणजे प्राथमिक शिक्षणाच्या दिवसांपासून शिक्षण पूर्ण होईपर्यंतच्या काळात कोणताही स्तंभ कमकुवत राहिल्यास, ती व्यक्ती यशस्वी होण्याची शक्यता कमी आहे. त्यानंतर नोकरी देणारी कौशल्ये येतात. आपल्या समाजाला आज भेडसावणारी समस्या ही आहे की शैक्षणिक संस्था मुख्यत्वे अभ्यासक्रम केंद्रित आहेत. पालक त्यांच्या मुलांना परीक्षेत किती गुण मिळतील या विचाराने चिंतित आहेत. उच्च शिक्षणाचे प्रवेश गुणांवर (मुख्यत्वे) आधारित आहेत. यामुळे शिक्षण प्रणाली "गुण आणि घोकंपट्टी" देणारी झाली आहे. विषय समजून घेणे दुय्यम झाले आहे. तरुणांच्या वर्तणुकीचा दर्जा खालावत चालला आहे.

जन्मजात मूलभूत कौशल्ये आणि गुणवैशिष्ट्ये यांना वाढविण्याच्या दिशेने कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही. प्रत्येक सामान्य मुलामध्ये पाच मूलभूत स्तंभांची वाढ करण्याची आणि त्यांना मजबूत करण्याची क्षमता असते. पण, हे स्तंभ मजबूत करण्याच्या दृष्टीने मुलांचे प्रशिक्षण केले जात नाही. मुलांची एकाग्रता सुधारण्यासाठी, स्मरणशक्ती धारदार करण्यासाठी, आठवण्याची क्षमता किंवा सर्जनशील विचार करणे वाढविण्यासाठी किंवा अगदी जबाबदारीची जाणीव अंगी बाणविण्यासाठी कोणीही पावले उचलत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, ४० मूलभूत गुणवैशिष्ट्ये व कौशल्ये आहेत (काहींच्या मनात विविध संख्या असू शकतात). त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात लक्ष दिले जात नाही. प्रामाणिकपणा, शिस्त, वेळेची जाणीव आणि मूल्ये समाजासाठी महत्वपूर्ण आहेत आणि तरुण वयात कोणीही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. अशी एक वेळ आलेली आहे की वाढत्या वयातील तरुणांचे वर्तन ही समस्या झाली आहे. भारतात पदवीधर झालेल्या अनेक तरुणांमध्ये संभाषण कौशल्याचा अभाव आहे. अनेकजण विचित्र वर्तणुकीचे दर्शन घडवितात. दिवसेंदिवस सहनशीलता कमी होत चालली आहे. इतरांना सामावून घेण्याची क्षमता, इतरांशी जूळवून घेण्याची वृत्ती आणि विविध परिस्थितींना स्वीकारण्याची क्षमता जलद गतीने नाहीश्या होत चालल्या आहेत. अशा अनेक समस्या आणि मूलभूत कौशल्ये व गुणवैशिष्ट्ये यांना वाढविण्याचा अभाव यांचा परिणाम म्हणून सामाजिक असुरक्षितता वाढत चालली आहे.

या सर्व प्रश्नांना प्राथमिक शिक्षणा दरम्यान संबोधित करणे आवश्यक आहे. २००५ मध्ये तयार केलेल्या भारतीय राष्ट्रीय अभ्यासक्रम फ्रेमवर्क मध्ये या पैलूचा उल्लेख आहे. पण, या संकल्पनेला शाळांमधील प्रत्यक्ष अभ्यासक्रम आणि पद्धती यांमध्ये कुठेच फारसे स्थान मिळत नाही.

एंटेल्की सिस्टिम्स अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडने अशी मूलभूत कौशल्ये व गुणवैशिष्ट्ये शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढविण्यासाठी वेब-आधारित तसेच 'उपक्रमांवर आधारित शिक्षणाचे' एक मॉडेल तयार केले आहे जे शाळांमध्ये आणि घरी देखील कार्यान्वित केले जाऊ शकते. ४० मूलभूत कौशल्ये व गुणवैशिष्ट्यांपैकी, १४ निर्णायक कौशल्ये व गुणवैशिष्ट्ये शालेय दिवसात आणि राहिलेली महाविद्यालयीन काळात या संस्थेद्वारा हाताळली जातात. ही प्रणाली मनोरंजक, वापरकर्त्यांना सोयीची आहे आणि तरुण मुले हे उपक्रम करण्यास उत्सुक असतात.

पारंपारिक प्रणाली मध्ये ही मूलभूत कौशल्ये व गुणवैशिष्ट्ये घरी आणि शाळेमध्ये विकसित केली जात होती. विद्यार्थ्यांच्या विकासाच्या दिशेने वैयक्तिक लक्ष ठेवण्याचे जे एक मोठे आव्हान आहे, ज्याच्यामुळे शिक्षक कोंडीत सापडत आहेत, ती प्रत्येक श्रेणीतील लोक समूहांनी निर्माण केलेली आहे. अभ्यासक्रम जास्त कठीण आहेत आणि तरुण विद्यार्थ्यांना त्यात त्यांचा न्याय मिळत नाही. त्यांच्या मुलांच्या मूलभूत कौशल्ये व गुणवैशिष्ट्ये यांच्यात सुधारणा करण्याच्या गरजांची पालकांना एकतर जाणीव नाही किंवा त्याकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ नाही कारण ते खूप व्यस्त आहेत.

"एंटेल्की" द्वारे विकसित केलेली प्रणाली या समस्येला संबोधित करते. या प्रणालीच्या अंमलबजावणीत ३ री इयत्तेपासून १० वी इयत्तेपर्यंत हळूहळू त्याच्या / तिच्या विद्यार्थ्यांचा विकास करण्यासाठी, शिक्षकांना प्रत्येक आठवड्यातील जास्तीत जास्त फक्त २ तासांचा वेळ देणे आवश्यक असते. इयत्तेनुसार विकासाची पायरी वाढत जाते. विविध स्तरातील शाळा चार स्तरीय निरीक्षण यंत्रणेतून हाताळल्या जाऊ शकतात. विद्यार्थ्यांवर होणारे आतापर्यंत दिसलेले परिणाम लक्षात घेतल्यावर म्हणावेसे वाटते की ही प्रणाली खरंच अंमलबजावणी करण्यायोग्य आहे.

 

मराठी